जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हास्तरीय लोकशाही दिनात आज ५७ तक्रार अर्जांवर सुनावणी घेण्यात आली.
आज जिल्हास्तरीय लोकशाही दिनात महसुल विभाग – १२, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था – ३५ ,जिल्हा पोलीस अधिक्षक – १,जिल्हा परिषद – ५ , जिल्हा भूमी अभिलेख – ३, जिल्हा जात पडताळणी विभाग- १ अशा एकूण ५७ तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत.
जळगाव जिल्ह्यात तालुका स्तरावर दर महिन्याला तिस-या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिन आयोजीत करणे आवश्यक असून तालुका स्तवरावर लोकशाही दिनाचे आयोजन होत नसल्यामुळे जिल्हास्तरावरील लोकशाही दिनात तालुकास्तरावरील तक्रारी मोठया प्रमाणात प्राप्त होत आहेत. तेव्हा नागरिकांनी तालुक्याशी संबंधित तक्रारीबाबत तालुकास्तरीय लोकशाही दिन दर महिन्याला तिस-या सोमवारी आयोजित करण्यात येणा-या लोकशाही दिनात प्रथमतः संबधित तहसिलदार यांचेकडेस तक्रार दाखल करावी व सदर तक्रारी बाबत एक महिन्याच्या आत निपटारा न झाल्यास जिल्हा लोकशाही दिनात तक्रार दाखल करतांना तालुका स्तरावर दाखल केलेल्या अर्जाची प्रत जोडण्यात यावी. त्याशिवाय जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज स्विकारले जाणार नाहीत. असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.