जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील रिक्त असलेल्या पोलिस पाटील व कोतवालांच्या ३८० जागांसाठी येत्या दोन दिवसांत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील १५ तालुक्यांत १५०४ गावे आहेत. या भागातील सजाची संख्या ५०१ आहे. त्यादृष्टीने कोतवालांची ४९५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३९५ कोतवाल कार्यरत असून, रिक्तपदांच्या ८० टक्के प्रमाणात कोतवालांच्या जागा भरण्यात येणार आहेत. तर पोलिस पाटील पदासाठीही आरक्षणनिहाय भरती होणार आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीला जवळपास ३३० पदे रिक्त आहेत. महिनाभर चालणाऱ्या या प्रक्रियेद्वारे कोतवालांच्या ८१ तर पोलिस पाटील पदाच्या ३०० जागा भरण्यात येणार आहेत.
तालुकानिहाय कोतवालांची भरली जाणारे पदे
जळगाव : (रिक्त- ६, भरली जाणारी पदे -५)
जामनेर : (रिक्त- ७, भरली जाणारी पदे -६)
एरंडोल : (रिक्त- ४ , भरली जाणारी पदे -३)
धरणगाव : (रिक्त- ६, भरली जाणारी पदे -५)
पारोळा : (रिक्त- ६, भरली जाणारी पदे -५)
भुसावळ : (रिक्त- २, भरली जाणारी पदे -२)
बोदवड : (रिक्त- ४, भरली जाणारी पदे -३)
मुक्ताईनगर : (रिक्त- ७, भरली जाणारी पदे -६)
यावल : (रिक्त- ७, भरली जाणारी पदे -६)
रावेर : (रिक्त- ८, भरली जाणारी पदे -६)
यावल : (रिक्त- ७, भरली जाणारी पदे -६)
पाचोरा : (रिक्त- ८, भरली जाणारी पदे -६)
भडगाव : (रिक्त- ८, भरली जाणारी पदे -६)
चाळीसगाव : (रिक्त- ८, भरली जाणारी पदे -६)
अमळनेर : (रिक्त- ८, भरली जाणारी पदे -६)
चोपडा : (रिक्त- १२, भरली जाणारी पदे -१०)
एकूण रिक्त – १०१ भरती होणार ८१