कासोदा, ता. एरंडोल (प्रतिनिधी) कासोदा पोलिसांनी ४ सिलिंडरसह रिफिलिंगचे साहित्य जप्त करत एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कासोदा येथील पोलीस ठाणे हद्दीत ६ नोव्हेंबरला सकाळी ११.५० वाजता शहरातील मारुती मंदिर परिसरातील पांडे गल्लीत अरुण जगन्नाथ चिंचोले (वय ६०) यांच्या घराच्या आडोशाला घरगुती वापराच्या एलपीजी इंडियन कंपनीच्या गॅस सिलिंडर बेकायदेशीर रित्या वाहनांमध्ये रिफिल करण्यासाठी ठेवलेले होते.
पोलिसांनी येथून १२ हजार १०० रुपयांचे इंडियन कंपनीचे ४ गॅस सिलिंडर व गॅस सिलिंडर भरण्याची मोटर, वायर, नळ्या आढळून आल्यात. या कारवाईनंतर अरुण चिंचोले यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता क्र. २८७ सह जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि नीलेश राजपूत यांचे मार्गदर्शनात हेड कॉन्स्टेबल श्रीराम गायकवाड करत आहेत.