जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले असून प्रत्येक रुग्णाला रेमीडीसीवर इंजेक्शन देण्याचे तज्ञ डॉक्टर सल्ला देत आहे. बाजारात सदरचे इंजेक्शनची किंमत तीन ते पाच हजार रुपये पर्यंत असल्याने त्याची झड रुग्णांना पोहोचत आहे. या सर्व बाबीचा विचार करून जळगाव जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेली जळगाव जिल्हा मुस्लिम मानियार बिरादरीने रुग्णांसाठी नामांकित कंपनीचे रेमीडीसी वर इंजेक्शन हे फक्त एक हजार पन्नास रुपयात जळगाव शहरातील नामांकित मेडिकल स्टोअर मधूनच उपलब्ध करून देत आहे.
रेमीडीसीवर इंजेक्शनसाठी रुग्णांनी आपला आधार कार्ड, कोविड पॉझिटिव्हचे प्रमाणपत्र, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन, व जर सरकारी रुग्णालयात असेल तर केस पेपरची प्रत हे चारही पेपर घेऊन खालील व्यक्तींना दूरध्वनीद्वारे संपर्क साधावा तसेच कोविड साठी लागणारी औषधी सुद्धा माफक दरात उपलब्ध करून देण्यात येईल. असे आवाहन जळगाव जिल्हा मुस्लिम मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
संपर्कासाठी
फारुक शेख (९४२३१८५७८६), अडव्होकेट आमीर शेख (९४२३४८७७८६), अल्ताफ शेख (९४२३९७८६११).