TheClearNews.Com
Friday, June 20, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘भारतीय स्वातंत्र्याची गाथा’ प्रदर्शनातून क्रांतिकारक इतिहासाचे स्मरण – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे महात्मा गांधी उद्यानातील 'भारतीय स्वातंत्र्याची गाथा' प्रदर्शनाला जळगावकरांना भेट देण्याचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
August 16, 2022
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी)  गांधी रिसर्च फाऊंडेशन जिल्ह्यासाठी मानबिंदू असून फाऊंडेशनतर्फे समाजप्रबोधनात्मक सांस्कृतिक उपक्रम सदैव सुरू असतात. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे महात्मा गांधी उद्यान येथे स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वपूर्ण घटनांवर आधारित ‘भारतीय स्वातंत्र्याची गाथा’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना आपल्या गौरवशाली, क्रांतिकारी इतिहासाची आठवण प्रदर्शन पाहिल्यानंतर होते. स्वातंत्र्याचा इतिहास चित्रस्वरूपात रोचकपध्दतीने मांडण्यात आला असून त्यात संविधान निर्मिती, संस्थाने विलगिकरणसह अन्य महत्त्वाच्या बाबी युवा पिढीला प्रेरक आहे. असे सांगत स्वातंत्र्याची गाथा समजून घेण्यासाठी जळगावकरांनी प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. यावेळी महात्मा गांधी उद्यानातील ‘आय लव्ह जळगाव’ या सेल्फी पाँईटचेही उद्घाटन करण्यात आले.

महात्मा गांधी उद्यानातील गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आयोजित ‘भारतीय स्वातंत्र्याची गाथा’प्रदर्शनाच्या उद्धघाटनाप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत बोलत होते. याप्रसंगी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक व जैन इरिगेशन सिस्टीम लि. अध्यक्ष अशोक जैन, केशवस्मृती प्रतिष्ठानचे भरतदादा अमळकर, विजय मोहरील, बी. डी. पाटील, ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, उदय पाटील, विराज कावडीया, अमित जगताप, राजेश नाईक, उदय महाजन, डाॕ. अश्विन झाला, नितीन चोपडा, आशिष भिरूड उपस्थित होते.
पुढे बोलताना अभिजीत राऊत म्हणाले, सर्वसामान्यांना स्वातंत्र्य आणि संविधानातील मुलभूत अधिकार व कर्तव्यांची वास्तविक जाणिव व्हावी जेणेकरून संविधानावर आधारित राष्ट्रनिर्मितीसाठी प्रोत्साहन मिळेल; यासाठी असे उपक्रम प्रेरणादायी असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत म्हणाले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जून 2025

वराड येथे लग्न समारंभात नाचण्यावरून वऱ्हाडी मंडळींमध्ये तुंबळ हाणामारी

भारतावर ब्रिटिशांनी केलेल्या अन्याय अत्याचाराविरूध्द स्वातंत्र्य सैनिकांनी चळवळ, आंदोलनांच्या माध्यमातून प्रतिकार केला. वेगवेगळ्या ठिकाणांची स्वातंत्र्य सैनिकांची भुमिका ऐतिहासिक ठरली. त्याग, बलिदानातून भारताची शौर्य गाथा लिहली गेली. स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वपूर्ण घटनांवर आधारित ‘भारतीय स्वातंत्र्याची गाथा’ या प्रदर्शनात शिक्षणव्यवस्था, अर्थव्यवस्था,समाजव्यवस्था आणि मूल्यव्यवस्थेची समृद्ध परंपरा समजून घेता येते.
भारतातील संस्कृती, भौगोलिक विविधेतुन समृद्ध नैसर्गिक संपदा, प्रेम सहिष्णुतेची शिकवण यामुळेच भारत म्हणजे सोन्याची खाण असे म्हटले जायचे. प्रदर्शनात पहिले पॕनेल हे ‘भारत सोने की चिडीया’ हे भारतातील नैसर्गिक सौंदर्य, वास्तू, शिल्प यासह समृद्ध वारसा दर्शविते.
ऐतिहासिक स्थळे हा गौरवशाली इतिहास ते 1947 पर्यंत च्या स्वातंत्र्य संग्रामातील महत्वपूर्ण घटनांची माहिती, महात्मा गांधी आणि गांधी युगाव्दारे स्वातंत्र्यासाठी केलेले प्रयत्न, नेताजी सुभाषचंद्र बोस सह अन्य स्वातंत्र्यविरांच्या रचनात्मक भुमिका, यासह अनेक बाबींवर तथ्यांच्या आधारावर तपासून छायाचित्रांसह जळगावकरांना आपला गौरवशाली इतिहास अनुभवता येत आहे. या प्रदर्शनात स्वातंत्र्य अर्ध्या रात्रीच का मिळाले? असे अनेक रोचक प्रश्नाचे आकलन होते. भारतीय राष्ट्रध्वज, संविधान, स्वातंत्र्य संग्राम आणि संस्थांनाचे भारतात विलगीकरणातुन संयुक्त भारत अशी वस्तुनिष्ठ माहीती नागरिकांना मिळते.
भारतीय राष्ट्रध्वजाचा आरंभ कसा झाला त्याची निर्मिती प्रक्रिया, काळानुसार बदलेले राष्ट्रध्वजाचे स्वरूप हा इतिहास यातून उलगडा आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी संपूर्ण भारतातील राजे, राजवाडे, संस्थाने भारतात विलगिकरण कसे झाले, त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांची भुमिका अशी रोचक माहिती प्रदर्शनातुन नागरिकसमोर मांडली आहे. स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी संविधान कसे महत्त्वाचे आहे. सकारात्मक दृष्टिकोनातून राष्ट्रनिर्माण करण्यासाठी संविधानाची आवश्यकता, संविधान या संकल्पनेविषयी प्रदर्शनात माहिती आहे. प्रदर्शन यशस्वीतेसाठी योगेश संधानशिवे, अशोक चौधरी, सी. डी. पाटील, निवृत्ती वाघ यासह गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी यांनी सहकार्य केले. डाॕ. अश्विन झाला यांनी सूत्रसंचालन केले.

शाळा, महाविद्यालयांसाठी अभ्याससहल
महात्मा गांधी उद्यानातील प्रदर्शन सकाळी 7 ते 10 तर संध्याकाळी 5 ते 10 दरम्यान सर्वांनसाठी खुले असेल. तसेच शाळा, महाविद्यालयांना विशेष गृपसह प्रदर्शनाला भेट देता येणार आहे. त्यासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशन व्यवस्थापनाची परवानगी घ्यावी लागेल. यासाठी निलेश पाटील मो.9404955300; 02572264803 यांच्याशी संपर्क करावा,असे कळविले आहे.

आय लव्ह जळगाव….
महात्मा गांधी उद्यानातील सौदंर्यामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ‘आय लव्ह जळगाव’ या सेल्फी पाँईट निर्मिती करण्यात आली आहे. या सेल्फी पाँईटचे लोकार्पण आज स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याहस्ते करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जून 2025

June 20, 2025
गुन्हे

वराड येथे लग्न समारंभात नाचण्यावरून वऱ्हाडी मंडळींमध्ये तुंबळ हाणामारी

June 19, 2025
गुन्हे

शंभर टन चोरीची राख वाहणाऱ्या दोन डंपरवर कारवाई

June 19, 2025
गुन्हे

बालकाचा गळा चिरुन खून करणाऱ्यांचा पर्दाफाश

June 19, 2025
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 जून 2025

June 19, 2025
धरणगाव

धरणगाव नगरपालिका कृती आराखडा समितीच्या सदस्यपदी विनोद रोकडे यांची निवड !

June 18, 2025
Next Post

गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये अमृत महोत्सव उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महापौरांचा सर्जिकल स्ट्राईक: ख्वाजामियाँ चौकातील ‘ते’ वादग्रस्त अतिक्रमण हटविले !

January 21, 2021

जिल्हा कोषागार विभागामार्फत निवृत्तीवेतनधारकांना आवाहन

November 15, 2021

जळगाव ग्रामीण मतदार संघातील बसेस तात्काळ सुरु करा ; देवकरांचे विभाग नियंत्रकांना पत्र !

August 9, 2021

यावल अभयारण्यात पट्टेदार वाघाचे दर्शन !

January 7, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group