जळगाव (प्रतिनिधी) न कळत अंघोळ करण्याचा व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात असून संशयित आरोपी राहुल योगराज पाटील याला अटक करण्यात आली आहे.
राहुल पाटील याने २२ वर्षीय पिडीतेचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ गुपचूप काढून घेतला होता. त्यानंतर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत १ जानेवारी ते १३ फेब्रुवारी या दरम्यान पिडीतेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकरणी विविध कलमान्वये राहुल पाटीलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात असून पोलिसांनी त्याला अटक देखील केली आहे. पुढील तपास सपोनि माधुरी बोरसे ह्या करीत आहेत.