धरणगाव (प्रतिनिधी) येथील जागृत देवस्थान श्री मरी माता मंदिराचा जीर्णोद्धार सोहळ्याचे २५ डिसेंबरला सायंकाळी ७ वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच खासदार उन्मेष पाटील यांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले आहे.
या वेळी या दोन्ही मान्यवरांच्या हस्ते मंदिराचा जीर्णोद्धार केला जाईल. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, महामंडलेश्वर भगवानदास महाराज, माजी नगराध्यक्ष नीलेश चौधरी, भाजपच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अॅड. संजय महाजन, काँग्रेसचे प्रदेश सचिव डि. जी. पाटील, विद्यापीठाचे सिनेट सदस्य दिलीप पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक वाघमारे, चर्मकार महासंघाचे भानुदास विसावे, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आयोजकांनी कळवले आहे.












