जळगाव (प्रतिनिधी) शर्तील गेंदालाल मिल परिसरात किरकोळ वादातून एका रिक्षाचालकाने तरुणावर चाकु हल्ला केल्याची १५ डिसेंबर रोजी रात्री घडली.
या संदर्भात अधिक असे की, जुबेर शेख, भिकन शेख (वय १९, रा. गेंदालाल मिल) हा तरूण त्याचे मित्र लक्ष्मण भदाणे आणि अल्ताफ खान यांच्यासोबत गेंदालाल मिल परिसरातील डॉ. सुरज पाटील यांच्या दवाखान्याजवळ मंगळवारी रात्री ११ वाजता गप्पा मारत बसलेला होता. त्याचवेळी रिक्षाचालक किशोरने त्याला कट मारला. जुबेरने याचा जाब विचारल्याचा राग आल्याने किशोरने जुबेरला शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. नंतर चाकुने त्याच्या डाव्या हाताचे मनगट व गळ्यावर वार केला. जुबेरवर हल्लाकेल्यानंतर रिक्षाचालक किशोर पळून गेला.दरम्यान, जुबेरच्या फिर्यादीवरुन किशोर (रिक्षाचालक) याच्या विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















