पारोळा (प्रतिनिधी) पारोळा शहर पास केल्यावर नवीन बायपास रोडच्या कॉर्नर जवळ एका व्यक्तीला रस्त्यावर अडवून रोकडसह मोबाईल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस स्थानकात अमोल दत्तू पाटील, लखन फकिरा गायकवाड, भुऱ्या उर्फ नाजीम खान मुक्तारखान कुरेशी आणि एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात दीपक भिला पाटील (वय ३६, रा. करंजी ता. पारोळा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ५मे २०२२ रोजी रात्री २.३० वाजेच्या सुमारास करंजी येथून वाहन आयसर गाडी क्र. (MH 18 BG 0032) ने नँ. हॉ, क्र 6 वरुन खामगाव कडेस जात होते. पारोळा शहर पास करुन नविन वायपास रोडच्या कॉर्नर जवळ रात्री २.५० वाजता एक महीला व एक ईसम यांनी हात देवून गाडी थांबविण्यास ईशार केल्याने त्यांना कुठेतरी जावयाचे असेल म्हणून दीपक पाटील यांनी त्यांची गाडी रोडच्या बाजूला थांबवली. तेव्हा ते ईसम क्लीनर साईडचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होते. परंतु दरवाजा उघडत नसल्यामुळे दीपक पाटील गाडीतून खाली उतरुन दरवाजा उघडण्यास गेलो,तेव्हा अजून दोन ईसम त्यांच्याकडे धावत आले. त्यापैकी एकाने श्री. पाटील कॉलर पकडली आणि शर्टच्या खिशातून ७ हजार ५०० रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल व ५ हजार रुपये रोख काढून घेतले. अर्जंट माल पोहचविणे असल्याने दीपक पाटील हे खामगांवसाठी निघून गेले. घरी परत आल्यावर ट्रक चालकास लुटपाट करणाऱ्या लोकांना पारोळा पोलीसांनी पकडले आहे. म्हणुन श्री.पाटील यांची खात्री झाली की, त्यांना लुटणारे पण हेच असतील. पोलीस स्टेशनला आल्यावर लॉकअप मधील आरोपी दाखविला असता श्री. पाटील यांनी आरोपींना ओळखले. याप्रकरणी पारोळा पोलीस स्थानकात अमोल दत्तू पाटील, लखन फकिरा गायकवाड, भुऱ्या उर्फ नाजीम खान मुक्तारखान कुरेशी आणि एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास सपोनि रविंद्र बागुल हे करीत आहेत.