जळगाव (प्रतिनिधी) सीमा तपासणी नाका कर्की येथील बोगस वाहन कराच्या पावती पुस्तकाबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांना पत्र लिहून तक्रार केली होती.
एकनाथराव खडसे यांनी म्हटले आहे की, माझ्या मुक्ताईनगर मतदार संघातील आपल्या विभागाचे चेक नाके असून तेथील रोखपालास हाताशी धरून सिमा तपासणी नाक्याजवळ असलेल्या शांताई पेट्रोल पंपावर काम करणारे कर्मचारी हे बाहेरील राज्यातील वाहनास पैसे घेवुन तात्पुरत्या परमिटच्या कराच्या पावत्या देतात. सदर त्या पावत्यांची नोंद आपल्या सिमा तपासणी नाका कर्फी येथील नोंद वहीत न घेता परस्पर शासकीय महसुल खिशात ठेवुन घेतात. अशा प्रकारे लाखो रूपयांचा शासकीय महसुल भरणा न करता बुडविण्यात आला आहे. आपण या बाबत आपल्या स्तरावर योग्य ती चौकशी करून शासनाच्या महसुलाची होणारी चोरी थांबवावी, अशी आपणांस विनंती करण्यात येत आहे. सोबत आपणांस पुरावा म्हणुन पेट्रोल पंपावर रोखपालाने स्वतः हस्ताक्षरात लिहलेल्या व तपासणी नाक्यावर नोंदी नसलेल्या पावत्या गाडी क्रमांकासह पाठविण्यात येत आहे.