पुणे (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी नुकताच आपला अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय क्षेत्रात विविध चर्चाना उधाण आले आहे. सध्या त्यांच्याकडे महिला आयोगाचे अध्यक्षपदही आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला आहे. यानंतर सहाजिकच महिला प्रदेशाध्यक्ष पद देखील रिकामे झाले होते. यानंतर रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादीकडून महिला प्रदेशाध्यक्षापद देण्यात आले होते. आता महिला प्रदेशाध्यपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याकडे सर्वांचे लक्ष वेधून लागले आहे. रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाची सुत्र हाती घेताच अनेक मोठं- मोठी प्रकरणे हाताळली. यामुळे त्यांचे ते काम बघता त्यांना त्याच पदावर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रस्त्यावरच्या आंदोलनापासून ते भव्य व्यासपीठ आणि हजारोंच्या गर्दीमध्ये रुपाली चाकणकर यांचे वेगळेपण बघायला मिळाले आहे. विषयांची मुद्देसूद मांडणी, सडेतोड उत्तर, करारीपणा, कधी कोट्या करुन विरोधकांना नामोहरम करणं याकरिता रुपाली चाकणकर ओळखले जाऊ लागले आहेत. लग्नानंतर सासरच्या चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे रुपाली चाकणकर यांचा देखील राजकारणात प्रवेश झाला होता.