मुंबई (वृत्तसंस्था) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या टेलरबॉम्बवर प्रतिक्रिया देताना, सत्य बाहेर यायला पाहिजे असे म्हटले आहे. मूळातच हे पत्र अतिशय गंभीर आहे. या पत्रातील मजकूर हा सर्वांना विचार करायला लावणारा आहे. एकूणच महाराष्ट्रात जे घडतंय ते महाराष्ट्राच्या आणि पोलिसांच्या प्रतिमेसाठी चांगलं नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
उच्च न्यायलयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिले आहेत. आता, ही चौकशी होऊन दूध का दूध आणि पानी का पानी झालं पाहिजे. या सर्वच प्रकरणातील सत्य बाहेर आलं पाहिजे, सत्य जर बाहेर आलं नाही तर ही डागाळलेली प्रतिमा कधीच नीट होणार नाही, असेही फडणवीस यांनी म्हटले. उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर जेलिटीनच्या कांड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळल्यापासून सुरु झालेल्या सचिन वाझे प्रकरणाला रोज नवे वळण मिळत आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर आता सचिन वाझेनेच आणखी एका पत्रातून स्फोट केलाय.
शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी भेंडी बाजारमधील सैफी बुऱ्हानी ट्रस्टतर्फे सुरू असलेल्या भव्य क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पाची चौकशी करावी आणि त्यांच्या ट्रस्टीना वाटाघाटी करण्यासाठी माझ्यासमोर आणावे. त्यांच्याकडून ५० कोटी रुपये वसूल करण्यासाठी तू प्राथमिक बोलणी करून घे, असे मला त्यांच्या शासकीय बंगल्यावर बोलवून सांगितले”, असा खळबळजनक आरोप सचिन वाझे यांनी आपल्या पत्रात केला आहे. या पत्रावरुन महाराष्ट्रात मोठा गदारोळ माजला असून विरोधकांनीही सरकाराला लक्ष्य केलं आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी जे जबाब नोंदवले जात असतील त्याची नीट चौकशी झाली पाहिजे. व सत्य योग्य प्रकारे बाहेर आलं पाहिजे. कारण सरकारची प्रतिमा डागाळत आहे, असं म्हटलं आहे.
रेमडेसिव्हीरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करावी
‘सरकारने रेमडेसिवीरच्या संदर्भात विषेश लक्ष देण्याची गरज आहे. रेडमेसिवीरचा काळाबाजार काही जण करत आहेत. करोनाची दुसरी लाट देशातील काही राज्यात आहे. त्यामुळं आपल्या राज्यांनं ज्या राज्यात करोनाची लाट नाही त्या राज्यातून रेमडेसिवीर घ्यायला हवं. काळबाजार करणाऱ्यावर सरकारने कारवाई करण्याची गरज आहे,’ असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.