TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फैजपूर नाभिक युवा संघटनेतर्फे शासनाचा निषेध करीत अनोखे आंदोलन

The Clear News Desk by The Clear News Desk
April 8, 2021
in फैजपूर
0
Share on FacebookShare on Twitter

फैजपूर (प्रतिनिधी) महाराष्ट्रात दि. ४ एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळ व सर्व पक्षीय बैठकीत लॉकडाउन ऐवजी कडक निर्बध जाहीर करीत असताना “सलून दुकाने (केश कर्तनालये) बंद ठेवावी” या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाचा फैजपूर शहरातील व समस्त महाराष्ट्रातील नाभिक समाजातर्फे जाहीर निषेध करीत पत्र पाठवा आंदोलन करण्यात आले.

फैजपूर उपविभागीय अधिकारी तथा प्रांतधिकारी कडलग व नगर परिषदेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांना समाजाचे प्रतिनिधी बंटी आंबेकर यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.

READ ALSO

फैजपूरमध्ये चोरट्यांचा गॅस गोदामावर डल्ला १०० भरलेले सिलिंडर लंपास

स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन !

हातावर पोट असलेला नाभिक समाज आहे व केशकर्तन हा परंपरागत व्यवसाय असून या कारणामुळे पूर्ण सलून व्यवसाय हा अडचणीत सापडलेला आहे. सद्यस्थितीत कोरोनाच्या भीतीमुळे ग्राहकांनी सलून दुकानांकडे पाठ फिरवल्यामुळे गेले वर्षभर आमचा समाज पुरता हवालदिल झाला आहे. यामुळे समस्त सलून व्यवसायिकांना (नाभिक समाजास) दुकान भाडे, घर भाडे, लाईटबिल, पाल्यांचे शिक्षण, दैनंदिन अन्न धान्याबाबत आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या आलेल्या आर्थिक समस्यांना कंटाळून मागील काही काळात महाराष्ट्रातील विविध भागातील सलून व्यवसायिकांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपविले. अवघ्या महाराष्ट्रातील सलून व्यावसायिकांनी महाराष्ट्र शासनाकडे वारंवार आर्थिक मदतीचे निवेदन देऊनही शासनाने त्याची दखल अद्यापपावेतो घेतलेली नाही. फक्त आश्वासनांची पाने सलून व्यवसायिकांच्या तोंडाला पुसली. आजवर फक्त महाराष्ट्र शासनाने उठ सुठ सलून व्यवसाय बंद असेच आदेश काढलेले आहे.

सलून व्यवसायिक हे माणूस नाहीत का किंवा त्यांच्या जीवाची व परिवाराची त्यांना काळजी नाही का? महाराष्ट्र शासनाने एकदा तरी सिद्ध करावे कि सलून व्यवसायिकांमुळे कोरोनाचा फैलाव होतो ते? का सलून व्यवसायिकांना कोरोनाचा हॉटस्पॉट ठरविले जाते? बँकांमध्ये, बाजार पेठेत, अन्य व्यवसायिक दुकानांमध्ये होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव होत नाही का? सलून व्यवसायिकांनाच बळींचा बकरा का बनविले जाते? याबाबत महाराष्ट्र शासन उत्तर देण्यासाठी बाधील आहे. नाभिक समाज हा गरीब आहे पण भिक मागणारा समाज नाही तो स्वबळावर जगणारा समाज आहे, समाजास शासनाने कुठलीही मदत नाही केली तरी चालेल पण त्यांचे तोंडची भाकरी तरी हिसकावू नका. महाराष्ट्र शासनास इतकीच विनंती आहे की, सलून व्यवसायास आपणाकडून परवानगी मिळावी. ही विनंती आहे. ज्या प्रमाणे आधी जसे सलून व्यवसायिक शासकिय निकषाचे पालन करून व्यवसाय करत होता तसाच आता सुद्धा करील. व होणाऱ्या बेरोजगारीची झळ अंशतः कमी होईल.

शासनाने परवानगी न दिल्यास समस्त सलून व्यवसायिक हा रस्त्यावर उतरेल, व येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व इत्यादी निवडणुकांवर पूर्ण महाराष्ट्रातून बहिष्कार करेल. रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले जाईल. त्याचप्रमाणे या लाखो सलून व्यावसायिकांच्या पोटावर पाय देणाऱ्या आघाडी सरकारचा फैजपूर नाभिक युवा संघ जाहीर निषेध करीत आहे. त्याचप्रमाणे शासनाचे डोळे उघडावेत म्हणून परिस्थती नसतांना सुद्धा फैजपूर शहरातील समस्त नाभिक बांधवांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना वैयक्तिक साध्या पोष्टाने पत्र पाठवून निषेध नोंदवून मंत्री महोदयांना पत्र पाठवा असे अनोखे आंदोलन पूर्णत्वास नेले.

यावेळी फैजपूर येथील नाभिक समाजाचे अध्यक्ष बंटी आंबेकर, सचिव प्रमोद जगताप, मयूर बोरसे, गोलू हातकर, अनिल मानकरे, वहिद सलमानी, साजिद सलमानी, सागर जाधव, शुभम सोनवणे आदी समाज बांधव उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फैजपूरमध्ये चोरट्यांचा गॅस गोदामावर डल्ला १०० भरलेले सिलिंडर लंपास

April 26, 2026
फैजपूर

स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन !

June 29, 2024
गुन्हे

सावदा येथे डोक्यात दगड घालून सालदाराचा निर्घृण खून : चार तासात संशयित अटकेत !

March 30, 2024
गुन्हे

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, तीन वेळेस गर्भपात ; फैजपूर पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा !

July 2, 2023
गुन्हे

लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार, गर्भपात करण्यासही पाडले भाग ; फैजपूर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

July 2, 2023
फैजपूर

‘सुज्ञा’ने दहावी परीक्षेत मिळविले घवघवीत यश !

June 2, 2023
Next Post

जागतिक आरोग्य दिनानिमित्त शिवसेनेकडून धरणगाव ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा सत्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांसाठी भरडधान्याचे वाटप

September 30, 2020

रक्षकच बनला भक्षक ! १३ वर्षीय मुलीवर आधी स्टेशनवर गँगरेप नंतर पोलीस स्टेशनमध्येही बलात्कार

May 4, 2022

एरंडोलात अवैधरीत्या गुरांची वाहतूक करणारे वाहन पकडले !

November 27, 2023

भारतीय सेनेच्या सन्मानार्थ चाळीसगाव येथे आयोजित तिरंगा यात्रेत उसळला जनसागर…

May 19, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group