चाळीसगाव (प्रतिनिधी) भारताचा विजय दिवस आज सह्याद्री प्रतिष्ठानने लष्करी जवानाचा सन्मान करून साजरा केला.
१६ डिसेंबर १९७१ रोजी भारतीय लष्कराने पाकिस्तानवर विजय मिळवल्याने हा दिवस संपूर्ण भारतभर विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानद्वारे सर्वत्र ‘शौर्या तुला वंदितो’, या नावाने या दिवशी लष्करी जवानांचा सन्मान करून भारतीय लष्करासाठी आदर व्यक्त केला जातो, याचाच भाग म्हणून चाळीसगाव सह्याद्री प्रतिष्ठानच्या मार्फत दर्पण दीक्षित या नुकत्याच सेवानिवृत्त झालेल्या चाळीसगावच्या लष्करी जवानाचा शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे गजानन मोरे रणजीत पाटील बाळासाहेब सोनवणे जितेंद्र वाघ गणेश पप्पू पाटील दीपक राजपूत राहूल पवार नाना चौधरी मोहन भोळे ललित चौधरी रणजित अहीरे यश पवार संदीप वराडे आदी दुर्गसेवक उपस्थित होते