धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव तहसील कार्यालयाच्या आवारातून कारवाईसाठी जप्त केलेला अवैध वाळूचा ट्रक लंपास झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी देखील अशाच पद्धतीने कारवाईसाठी जप्त केलेल्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीची चोरी झाली होती. त्यामुळे तालुक्यातील वाळू माफियांची मुजोरी प्रचंड वाढली असल्याचे स्पष्ट होत आहे.
या संदर्भात लक्ष्मण सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अवैधरित्या वाळू वाहतुक करीत असतांना मिळून आलेली व कायदेशीर कार्यवाई कामी तहसील कार्यालयाच्या आवारात ट्रक क्र. (MH१९३७१८) लावलेला होता. १९ मार्चच्या रात्री ११ ते २० मार्चच्या सकाळी १० वाजेच्या दरम्यान, अज्ञात चोरट्याने वाळूने भरलेला हा ट्रक चोरुन नेला. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात असून पुढील तपास पोहेकॉ नाना ठाकरे हे करीत आहेत. दरम्यान, चक्क शासकीय कार्यालयातून चोरी करण्या इतपत वाळू माफियांची मजल गेल्यामुळे गावात आश्चर्य वक्त केले जात आहे.
मागील वर्षी देखील तहसीलच्या आवारातून ट्रॅक्सर व ट्रॉलीची चोरी
16 मार्च 2022 रोजी तहसील कार्यालय धरणगाव आवारात लावलेले 1 लाख 50 हजार रुपये किंमतीचे ट्रॅक्टर क्रमांक (MH 19.BG.6071) व ट्रॉली अज्ञात व्यक्तीने चोरी करुन नेले होते. हे ट्रॅक्सर व ट्रॉली बांभोरी येथील गिरणा नदीपात्रात वाळू चोरी करताना आढळून आले होते. त्यानंतर वाळू नदीपात्रात खाली करून नदी पात्रात ट्रॅक्टर व ट्रॉली तहसील कार्यालयात आणण्यात आले होते. याप्रकरणी तलाठी अलताब निझाम पठाण (वय ३३ या. अनिता नगर धरणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, त्यावेळी ट्रॅक्स ट्रॉली चोरीटयाने चोरुन नेले की मुद्याम चोरी करु देण्यात आले?, याबाबत गावात चांगलीच खंमग चर्चा रंगली होती.