जळगाव (प्रतिनिधी) येथील मातृशक्ती जिजाऊ फाउंडेशनतर्फे जिल्हा उद्योग केंद्राला सॅनिटाइझर डिस्पेन्सर भेट म्हणून देण्यात आले. कोरोना काळात जिल्हा उद्योग केंद्रात बाहेरून येणारे लोकांचे हात ऑटोमॅटिक पद्धतीने सॅनिटाईझ व्हावे या उद्देशाने फाउंडेशनतर्फे हे मशीन देण्याचे आले.
यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक आर. आर. डोंगरे यांनी फाउंडेशनच्या या उपक्रमाबद्दल आभार मानले. मातृशक्ती जिजाऊ फाउंडेशनच्या अध्यक्षा माधवी मुळे, सचिव महेश मूळे यांनी सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविला आहे. तसेच अनेक सामाजिक संस्थांना असे मशीन देणार असल्याचे मानस त्यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे आनंद विद्यासागर, सरकटे आदी उपस्थित होते.