सातारा (वृत्तसंस्था) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना खोचक टोला लगावला आहे. संजय राऊत हे एक नंबरचे डबल ढोलकी आहेत, तसच खुर्ची टिकवण्यासाठी राऊत काहीही करतील असा घणाघातही चंद्रकातं पाटलांनी केला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत हे एक नंबरची डबल ढोलकी आहेत. ममता बनर्जी मुंबईमध्ये आल्या की त्यांच्या सुरात सुर मिसळतात. दिल्लीत गेले की राहुल गांधी यांच्या सुरात सुर मिसळतात, अशी टीका पाटील यांनी केलीय. सत्तेची खूर्ची टिकवण्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. ममता बनर्जी यांनी युपीए कुठं आहे असा प्रश्न विचारला होता त्यावेळी संजय राऊत त्यांच्या बाजूला होते. राहुल गांधी वर्षाचे सगळे दिवस परदेशात असतात, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या. ममता बॅनर्जींच्या या वक्तव्यावर काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीतून डोळे वटारले असतील त्यामुळे लगेच त्यांची समजुत घालायला संजय राऊत गेले असतील अशी जहरी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी साता-यातील फलटण येथील कार्यक्रमात केली आहे. संजय राऊत यांनी काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीवरुनचं चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्यायावरुन देखील सरकारवर टीका केलीय. हे काय चाललय, गोंधळी सरकार आहे का? फक्त ओबीसी जागा वगळून निवडणुका म्हणजे कपाळाला हात मारून घायचा का?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला. निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय गोंधळात गोंधळ निर्माण करणारा आहे, असं पाटील म्हणाले. निवडणूक आयुक्तांनी हे आताच स्पष्ट करावं.राजकीय पक्षांनी दोनदा निवडणुका करायच्या का? असा सवाल देखील पाटील यांनी केला.















