मुंबई (वृत्तसंस्था) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या धमक्यांमुळेच आमदारांना परराज्यात जावं लागलं. संजय राऊत यांच्यापासून आमदारांच्या जीवाला धोका होता, असा दावा शिंदे गटाकडून निवडणूक आयोगासमोर लेखी स्वरूपात करण्यात आला आहे. (Maharashtra Political News)
निवडणूक आयोगापुढे ठाकरे विरूद्ध शिंदे गट आणि शिवसेना कुणाची हा वाद सुरू आहे. अशात आज लेखी युक्तिवाद दोन्ही गटांनी निवडणूक आयोगात दावा दाखल केला आहे. शिंदे गटाने मांडलेल्या लेखी भूमिकेत ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी धमक्या दिल्यामुळे आमदार पळून गेले असं शिंदे गटाने युक्तिवादात म्हटलं आहे. संजय राऊत यांनी धमकी दिल्यामुळे आमचे आमदार पळून गेले. पक्षात फूट पडल्याने शिंदे गटाचे आमदार आणि त्यांच्या कुटुंबीय यांना धोका निर्माण झाला, याची दखल माध्यमांनीही घेतली होती”, असा दावा लेखी युक्तिवादात करण्यात आलाय. या धमकीची दखल घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने आमदार आणि कुटुंबियांना सुरक्षा पुरवावी असे सरकाराल सांगितलं होतं”, असं शिंदे गटाच्या लेखी युक्तिवादात म्हटलं आहे. खासदार संजय राऊत हे आमदारांना वारंवार धमक्या देत होते. त्यामुळे ते परराज्यात निघून गेले आणि लवकर परत आलेच नाही, असं लेखी उत्तरही शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर सादर केलं आहे. दरम्यान, दोन्ही गटाने सादर केलेल्या उत्तरांवरून निवडणूक आयोग काय निर्णय घेतं? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Shivsena News)
 
	    	
 
















