मुंबई (वृत्तसंस्था) विधानपरिषदेसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आलेल्या १२ नावांमध्ये महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांचे नाव नसल्याने आता नव्या राजकारणाला सुरुवात होणार कि काय असे दिसत आहे. कारण सत्यजीत तांबे यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवर ‘श्रद्धा और सबुरी’ असे ट्वीट केले आहे. या सूचक ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुजय विखे पाटील यांच्या जागेवरुन वाद सुरु होता तेव्हाही सत्यजीत तांबे यांनी हेच ट्वीट केलं होतं. सत्यजीत तांबे यांचे वडील हे नाशिक पदवीधर मतदारसंघातून सध्या विधानपरिषदेचे आहेत आहे. तर त्यांचे मामा बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असून राज्याचे महसूल मंत्रीही आहेत. दरम्यान महाविकास आघाडीकडून काल राज्यपालनियुक्त विधानपरिषदेसाठीच्या १२ नावांचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देण्यात आला आहे. शिवसेनेच अनिल परब, राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि काँग्रेसचे अमित देशमुख यांनी या संबंधी राज्यपालांची भेट घेतली. दिलेल्या बारा नावात दोन नावे विशेष आहेत.