अमळनेर (प्रतिनिधी) देवगांव देवळी महात्मा फुले हायस्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती महिला शिक्षण दिवस म्हणून साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन अरविंद सोनटक्के यांनी केले तर माल्यार्पण आय. आर महाजन यांनी केले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनीं अश्विनी महाजन, नेहा पाटील, नंदीनी डांगे यांनी सावित्रीबाई यांचे कार्य विशद केले.
महात्मा ज्योतिराव फुले यांनी ज्या सनातनी काळात स्त्री शिक्षणाची चळवळ हाती घेऊन शूद्रातिशूद्रांना त्यांच्या गुलामगिरीची जाणीव निर्माण करून देणारे महान कार्य त्या काळात सावित्रीबाई फुले यांचे योगदान फार मोठे राहिले आहे. या संदर्भामध्ये जोतिबांनी म्हटले आहे की जे काही सामाजिक कार्य मी करू शकलो त्यात सावित्रीबाई यांचा वाटा मोठा आहे. म्हणून सावित्रीबाई फुले यांचे कार्य तमाम महिलावर्गाला प्रेरणादायी आहे. असे शाळेचे ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.
यावेळी शाळेचे शिक्षक एस. के. महाजन, एच. ओ. माळी, व शिक्षकेत्तर कर्मचारी एन. जी देशमुख, संभाजी पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक व सांस्कृतिक प्रतिनिधी आय. आर. महाजन यांनी प्रस्ताविक व आभार मानले.
















