अमळनेर (प्रतिनिधी) अनुसूचित जाती जमातीचे जात प्रमाणपत्र विनाशर्त मिळावे, अशी मागणी आदिवासी टोकरे कोळी समाजाच्यावतीने आमदार अनिल पाटील यांना निवेदन देऊन करण्यात आली.
आदिवासी टोकरे कोळी, दोर कोळी, टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी यांच्यावर अन्याय होत असून त्यांच्या मागण्या संदर्भात विधान सभेत आवाज उठवण्याची विनंती यावेळी आमदारांना करण्यात आली. यात प्रमुख मागण्या म्हणजे टोकरे कोळी जमातीचे अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र विना अट मिळावीत, त्यासाठी १९५० पूर्वीची जातीची नोंद असलेला पुरावा, मागू नये, जात पडताळणी समिती जळगाव येथे स्थापन करावी. वैधता प्रमाणपत्र विना अट मिळावी, वैधता प्रमाणपत्रासाठी १९५० पूर्वीचे जमातीचे नोंद असलेले पुरावे मागू नये. इनामवर्ग ६ ब हा वंश परंपरेचे बाबत असलेला पुरावा आहे. तोच आमचा १९५० पूर्वीचा धरावा. जागले हलके गाव कामगार हि नोंद म्हणजे आमची १९५० पूर्वीची अशा मागण्या अधिवेशनात मांडण्या बाबत निवेदन आमदार अनिल पाटील यांना समाज बांधवांच्यावतीने देण्यात आले.
यावेळी चंद्रशेखर कोळी, गणेश कोळी, परमेश्वर सैंदाणे, वसंत कोळी, योगेश बाविस्कर, मनोज कोळी, चेतन कोळी, हिरामण कोळी, संदीप कोळी, रविंद्र कोळी आदी समाज बांधव उपस्थित होते.