जळगाव (प्रतिनिधी) जिल्हास्तरीय आंतर शालेय बुद्धिबळ स्पर्धा कांताई सभागृह येथे पार पडल्या. गुरुवारी १४ वर्षातील मुला आणि मुलींच्या स्पर्धेत प्रथमता जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुका वगळता १४ तालुक्यांचा सहभाग होता एकूण १४० खेळाडूंचा सहभाग होता.
या स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे चंद्रशेखर देशमुख व रवींद्र धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धा स्विस लीग पद्धतीने ७ फेऱ्या मध्ये घेण्यात आल्या. विभागीय पातळीवरील निवड व पारितोषिक नाशिक विभागीय पातळीवर मुले आणि मुली गटातील प्रत्येकी पाच अशा दहा खेळाडूंना स्पोर्ट्स हाऊस जळगाव तर्फे सुवर्णपदक देण्यात आले.
पारितोषिक वितरण समारंभ महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष फारुख शेख यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी व्यासपीठावर स्पर्धेचे समन्वयक प्रशिक्षक श्री मीनल थोरात, स्पर्धेतील मुख्य पंच प्रवीण ठाकरे, सहाय्यक पंच दत्तू सोमवंशी, जिल्हा संघटनेचे चंद्रशेखर देशमुख ,रवींद्र धर्माधिकारी, तथा जामनेरचे एकलव्याचे मुख्याध्यापक प्रेम खोडपे हे उपस्थित होते.
प्रथम पाच आलेले व विभागीय पातळीवर निवड झालेले खेळाडू खालील प्रमाणे
मुले
खुशाल नरेश सोनार( राष्ट्रीय विद्यालय चाळीसगाव)
संस्कार संदीप पवार (न्यू इंग्लिश स्कूल कडोली तालुका एरंडोल)
हिमांशू चेतन वाघ (गुड शेफर्ड अकॅडमी चाळीसगाव)
दुर्वेश भोजू कोळी (किड्स गुरुकुल सावखेडा तालुका जळगाव)
आर्य कुमार कृष्णा शेवाळकर (गो से स्कूल पाचोरा)
मुली
अदिती संतोष अलाहित (गुरुकुल इंग्लिश स्कूल पाचोरा)
अवंती अमित महाजन (पोद्दार इंग्लिश स्कूल चाळीसगाव)
भाग्यश्री प्रशांत चौधरी (के नारखेडे विद्यालय भुसावळ) संस्कृती बापूसाहेब शिंदे
(ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल चोपडा)
चेतना निलेश पाटील (एकलव्य प्राथमिक विद्यालय जामनेर.)