जळगाव (प्रतिनिधी) शहरातील गेंदालाल मिल परिसरातून ३० हजार रूपये किंमतीचे भंगार अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेंदालाल मिल परिसरातील रहिवाशी शहनाज गुलबा खान (वय-३९) यांचे गेंदालाल मिल परिसरातीलच मनपा कार्यालयाच्या बाजुलाच मुस्कान स्क्रॅप नावाचे भंगाराचे दुकान आहे. २७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानातील ३० हजार रूपये किंमतीचे ३ क्विंटल वायरचे तुकडे, बारीक तांब्याची तारचे भंगार चोरून नेल्याचे २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास निदर्शनास आले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पो.ना. दिपक सोनवणे करीत आहे.