जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांचेमार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परिक्षा-२०२० शनिवार, दिनांक ४ सप्टेंबर, २०२१ रोजी रोजी सकाळी ११.०० ते १२.०० यावेळेत जळगाव शहरातील एकूण ३५ उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे.
या परिक्षेच्यावेळी कोणताही गैरप्रकार होवू नये व त्याठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये, याकरीता खबरदारीचे उपाय म्हणून ४ सप्टेंबर, २०२१ रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत जळगाव शहरातील एकूण 35 उपकेंद्रावर जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१) (२) (३) लागू केले आहे.
या परिक्षा केंद्राचे १०० मीटर परिसरात कोणीही प्रवेश करु नये. हे आदेश परिक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांचेसाठी लागु होणार नाही. त्याचबरोबर सर्व सबंधितांवर वैयक्तिकरित्या नोटीस बजाविण्यास पुरेसा कालावधी नसलेने फौजदारी प्रक्रीया संहिता १९७३ चे प्रकल्प १४४ (२) नुसार हे आदेश एकतर्फी काढण्यात येत असल्याचेही जिल्हादंडाधिकारी यांनी आदेशात म्हटले आहे.