पाळधी (प्रतिनिधी) धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंदराव शामराव नन्नवरे यांची केंद्र शासनाने नामनिर्देशित केलेल्या लोक प्रतिनिधी विद्यमान पंचायत समिती सदस्य यातून उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
शासन निर्णयान्वये अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक नियमाच्या अंमलबजावणी करण्यासाठी उपविभाग स्तरावर उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली. यात उपविभागीय अधिकारी एरंडोलचे अध्यक्ष असून गटविकास अधिकारी पंचायत समिती धरणगाव, एरंडोल, पारोळा यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सदर समितीची पहिली सभा आठ तारखेला पंचायत समिती सभागृह एरंडोल सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. सदर धरणगाव तालुक्यातून सदस्य म्हणून जनाबाई आसाराम कोळी, नांदेड मोहन बाबाजी शिंदे, रोटवद नवल धर्मा सपकाळे, चावल खेळा गोकुळ शंकर ननवरे, सतखेडा भानुदास शंकर विसावे, धरणगाव दिपक सावळे धार यांची निवड करण्यात आली असून सर्वत्र निवडीबाबत कौतुक करण्यात आले आहे.