धरणगाव (प्रतिनिधी) येथील सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते संजय तोडे यांची लहूजी शक्ती सेनेच्या प्रदेश सह-संघटकपदी निवड करण्यात आली आहे. लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष कैलासराव खंदारे यांनी ही निवड केली आहे.
लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात संघटनेच्या माध्यमातून समाज कार्य सुरू आहे. मातंग समाजाच्या समाजिक उन्नतीसाठी संघटनेचे कार्य सुरु आहे. प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे यांनी धरणगाव येथील संजय तोडे यांची संघटनेच्या महाराष्ट्र राज्यसह संघटकपदी निवड केली आहे. तोडे यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.











