जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र क्रिकेट अससिएशनच्या १६ वर्षा आतील आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धे साठी जळगांव जिल्हाचा संघ निवडीसाठी निवड चाचणीचे आयोजन रविवार दि. २४ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ८.०० वाजता अनुभुती आंतरराष्ट्रीय स्कूल मैदानावर करण्यात आले आहे.
दिनांक १ सप्टेंबर २००६ रोजी वा त्यानंतर जन्म झालेलेच खेळाडू या निवड चाचणी साठी पात्र असतील. अशा पात्र खेळाडूंनी खालील लिंकवर जाऊन आपली नाव नोंदणी करावी ; https://forms.gle/NFGYqqJcXev8j2b16 ऑलाईन नोंदणी केलेल्या खेळाडूंनी क्रिकेट साहित्यासह व फक्त क्रिकेटच्या पांढऱ्या गणवेशात मैदानावर सकाळी ८.०० वाजता हजर राहावे, असे जळगाव जिल्हा क्रिकेट अससिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव अरविंद देशपांडे, सहसचिव अविनाश लाठी यांनी कळविले आहे.