जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा परीषदेच्या शाळेतून मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झालेले असून कायम स्वरूपी सेवानिवृत्ती वेतन निश्चीती व उपदान मिळण्यासाठी तीन हजाराची लाच मागणाऱ्या यावल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वरीष्ठ सहायकाला एसीबीच्या पथकाने अटक केली आहे.
जिल्हा परीषदेच्या शाळेतून मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झालेले असून कायम स्वरूपी सेवानिवृत्ती वेतन निश्चीती व उपदान मिळण्यासाठी सिकंदर सायबु तडवी (वय-56, व्यवसाय- वरीष्ठ सहा. शिक्षण विभाग, पंचायत समिती,यावल ता.यावल,जि.जळगाव) यांनी तक्रारदाराकडे 3 हजाराची मागणी केली होती. परंतू तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार डीवायएसपी गोपाल ठाकुर, पो.नि. निलेश लोधी, पो.नि. संजोग बच्छाव, सफौ.रविंद्र माळी,पोहेकॉ.अशोक अहीरे, पोहेकॉ.सुनिल पाटील, पोहेकॉ.सुरेश पाटील, पोहेकॉ.रविंद्र घुगे, पोना.मनोज जोशी, पोना.सुनिल शिरसाठ, पोना.जनार्धन चौधरी, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर यांनी सापळा रचत गुन्हा दाखल केला आहे.