बीड (वृत्तसंस्था) माजलगाव तालुक्यातील एका गावात शेतात बकऱ्या चारणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना शनिवार तालुक्यातील एका गावात घडली. दरम्यान, पीडितेच्या फिर्यादीवरून तिघा जणांविरोधात ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
शनिवारी पीडित दोन अल्पवयीन मुली तालुक्यातील एका गावच्य शेजारी असणाऱ्या शेतात साडेअकरा वाजेच्या सुमारास शेळ्या चारत होत्या. याचवेळी तिघेजण दुचाकीवरून तेथे आले व यातील दोघा जणांनी या दोघींना जबरदस्ती उसामध्ये घेऊन जात अत्याचार केला. त्यानंतर रविवारी सकाळी पुन्हा यातील एकाने मुलीला धमकावत आपल्या मित्रासोबत संबंध ठेवण्यास भाग पाडले.
हा प्रकार पीडितेने आपल्या नातेवाइकांना सांगितला. दरम्यान, पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून विकास बरडे, करण माळी व केशव राऊत या तिघांविरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात पोक्सोसह कलमांन्वये गुन्हा दाखल केला. यातील तीनही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अविनाश राठोड करीत आहेत.