सावदा, ता. रावेर (प्रतिनिधी) येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरिक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने लाच स्वीकारतांना रंगेहात अटक केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, शहरातील एका दाखल झालेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला अटक न करण्यासाठी सावदा पोलीस स्थानकाचे सपोनि देवीदास इंगोले आणि उपनिरिक्षक समाधान गायकवाड यांनी ६० हजार रूपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर १५ हजार रूपये देण्याचे ठरले होते. परंतू तक्रारदारची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. या अनुषंगाने एसीबीने पथक तयार करत सापळा रचला. त्यानुसार सपोनि देवीदास इंगोले आणि उपनिरिक्षक समाधान गायकवाड यांना लाच स्वीकारतांना रंगेहात अटक करण्यात आली आहे.