वरणगाव (प्रतिनिधी) येथील फॅक्टरीत चार्जमन पदावर कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्यानेच सैन्य दलासाठी वापरण्यात येणाऱ्या एके ४७ बुंदकीच्या पाच काडतूस चोरुन नेत होता. प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकांच्या तपासाणीत हा प्रकार बुधवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आला. काडतूस चोरुन नेणाऱ्या चार्जमनला वरणगाव पोलीसांच्या ताब्यात दिले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे फॅक्टरी प्रशासनात खळबळ उडाली असून वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्याची मागणी होत आहे.
वरणगाव येथील ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव मध्ये कार्यरत असलेला कनिष्ठ अधिकारी सतीश जयंसिंग इंगळे ए ई (एस क्यूए ई) विभागाचे हा दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जेवणासाठी बाहरे जात होते. फॅक्टरीच्या बाहेर जात असताना त्याच्याजवळील (एम एच १९ ऐ टी १५०४) सायकलची सुरक्षा रक्षकांनी झडती घेतली. यावेळी त्यांच्या ताब्यात ऑयध निर्माणी येथे तयार होणारे (अॅम्युनेशन) ७.६२ ची ए के ४७ शस्त्र वापरली जाणारी ५ जिवंत काडतुस मोटरसायकलचे हेड लाईट कव्हर खाली मिळून आले. बंदुकीच्या गोळ्या सापडलेल्या असून त्यावेळेस सुरक्षारक्षकांनी सुरक्षा अधिकारी यांना बोलवून सदर बाब सांगितली असता त्या सुरक्षा विभागाच्या ऑफिसमध्ये बोलवुन नंतर पोलिसांना बोलवण्यात आले आहे.