गुंटूर (वृत्तसंस्था) काही जणांनी पतीसमोरच पत्नीवर सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात घडली आहे. यावेळी टोळक्याने पती-पत्नीस बेदम मारहाण करत त्यांचा ऐवज देखील लुटून नेला.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी रात्री ९.३० च्या सुमारास घडली. हे दाम्पत्य लग्नाच्या समारंभातून घरी परतत होते. बाइकवरुन ते सत्तेनापल्ली इथं जात होते. पलाडुगु चौकाजवळ काही लोकांनी त्यांची दुचाकी थांबवली. त्यानंतर दाम्पत्याला मारहाण केली. त्यांच्याकडून पैसे आणि सोनं लुटून घेतलं. त्यानंतर महिलेला खेचत बाजूच्या शेतात घेऊन गेले. याठिकाणी आरोपींनी महिलेवर सामुहिक बलात्कार केला. घटनेनंतर रात्री दाम्पत्य तक्रार नोंदवण्यासाठी सत्तेनापल्ली येथील पोलीस ठाण्यात पोहचले परंतु हा गुन्हा आमच्या हद्दीत घडला नसून तुम्हाला मेडिकोंडरु पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करावी लागेल असं सांगून तेथून पाठवले. त्यानंतर मध्यरात्री पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंदवून जखमी अवस्थेतील दाम्पत्याला गुंटूरच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.