मुंबई (वृत्तसंस्था) भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांचे काही आक्षेपार्ह व्हिडीओ संदर्भात ‘लोकशाही’ न्यूज चॅनेलने वृत्त प्रकाशित केल्यानंतर राज्याच्या राजकारणासह देशाच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे.
या व्हिडीओत आक्षेपार्ह स्थितीत सोमय्या दिसत आहेत. किरीट सोमय्या यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तीचे खासगी व्हिडीओ व्हायरल होत असल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. वृत्त प्रकाशित झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी यांनी सोमय्या यांच्याविरुद्ध भाजपने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तर सोमय्या यांचे तीन डझनहून अधिकचे आक्षेपार्ह व्हिडीओ असून यातील एक व्हिडीओ पब्लिक डोमेनमध्ये असल्याचे ‘लोकशाही’ न्यूज चॅनेलने आपल्या वृत्तात म्हटले आहे. या व्हिडीओमध्ये आक्षेपार्ह स्थितीत सोमय्या हे व्हिडीओ चॅट करत असल्याचे दिसत आहेत. या व्हिडीची सत्यता तपासून कारवाई करण्याची करण्याची मागणी आता विरोधी पक्षातील नेत्यांकडून व्हायला लागली आहे.
दरम्यान, किरीट सोमय्या यांच्याकडे गोपनीय माहिती असते. त्यांनी अनेक राजकीय नेत्यांचे घोटाळे बाहेर काढले आहेत. त्यामुळे अशा महत्वाच्या राजकीय नेत्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे राज्यासह देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
















