जळगाव (प्रतिनिधी) पतीसोबत वाद झाल्यानंतर सोबत काम करणाऱ्या एकाने २९ वर्षीय विवाहितेला आपल्या गावी बिहारमध्ये बोलवत तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या संदर्भात जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पिडीत विवाहीतेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तीचा पतीसोबत कौटुंबिक वाद झाला. यावेळी पिडीतेसोबत काम करणारा राजेशकुमार जयनारायण पासवान (संतोर, सहरसा, नारायणपूर, बिहार) याने फोनवरून संवाद साधत विश्वास संपादन केला. त्यानंतर राजेशकुमार याने पिडीतेला गावाकडे बोलवून तिच्यावर बलात्कार केला. तसेच सदरची घटना कोणासही सांगू नको, अशी धमकी दिली. याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउनि दिपक जगदाळेनेम हे करीत आहेत.