जळगाव (प्रतिनिधी) श्रद्धेय पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांना जन्मदिनाच्या पूर्व सध्येला उर्दू साहित्यिकांची कृतज्ञ पूर्वक आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पाळधी येथील ‘द क्लिअर न्यूज’चे पत्रकार शहेबाज देशपांडे यांना जळगाव जिल्हा मनियार बिरादरीतर्फे सन्मानित करण्यात आले.
नही खेल है दाग यारो से कह दो, के आती है उर्दू जुबा आते आते. मी अलिफ (अ) लिहून उर्दूची सुरुवात केली आहे. त्यानुसार उर्दू बोलो, उर्दु लिखो, उर्दू पढो समजो ज्याप्रमाणे श्रद्धेय पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांनी प्रत्येक भाषेला महत्त्व दिले. त्यांच्या त्या कृतार्थ जळगाव जिल्हा मनियार बिरादरीने त्यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त जो उर्दू साहित्यिकांचा मेळावा आयोजित केला आहे. त्या मेळाव्याचे मी उद्घाटन करीत आहे, अशा शब्दांत महापौर जयश्री महाजन यांनी आपल्या भावना व्यक्त करून उर्दू मेळाव्याचे उद्घाटन केले.
यावेळी व्यासपीठावर मुंबई उर्दू कारवाचे अध्यक्ष फरीद अहमद, एटीएमचे अध्यक्ष एजाज मलिक उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. रफिक आजी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे टेक्नॉलॉजी हेड ऑफ द डिपार्टमेंट प्रोफेसर डॉ. गयास उस्मानी, पिंच बॉटलचे मॅनेजिंग डायरेक्टर जफर शेख, श्रेष्ठ कादंबरीकार व कवी जोहर उस्मानी तथा जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख उपस्थित होते.