मुंबई (वृत्तसंस्था) शिंदे गटाने आज थेट मुंबई महापालिकेत घुसत महापालिका मुख्यालयात असलेल्या शिवसेना पक्ष कार्यालयावर शिंदे गटाने अर्थात शिवसेना पक्ष कार्यालयावर जबरदस्ती कब्जा मिळवला आहे. या बाबतचे वृत्त ‘झी २४ तास’ने दिले आहे.
मुंबई बाळासाहेबांच्या शिवसेनेची असा दावा शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे. शितल म्हात्रे, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, यशवंत जाधव, अशोक जाधव आणि इतर नेते उपस्थित होते. यामुळे मुंबईतील राजकारण चांगलेच पेटेले आहे. मुंबई महापालिका मुख्यालया बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. बाळासाहेबाच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मुंबई महानगरपालिकेत दाखल झाले होते. विधानसभेतल्या कार्यालयावरून याआधी झाला होता राडा. आता शिंदेंच्या नेत्यांचा पालिकेतल्या कार्यालयावर कब्जा केला आहे. कार्यालयाच्या ताब्यावरून दोन गटांमध्ये राडा होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेतील कार्यलयासाठी शिंदे गट आणि ठाकरे गट आमनेसामने आले आहे. या दरम्यान दोन्ही गटांमध्ये हमरीतुमरी पहायला मिळाली. तसेच कोणताही पेचप्रसंग उद्भवू नये यासाठी मुंबई पोलिसांनीही मध्यस्थी केली आहे.
…तर आम्ही त्यांचा आगाऊपणा मोडून काढू’, ठाकरे गटाकडून आक्रमक प्रतिक्रिया !
या सगळ्या गदारोळावर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. शिंद गटाचे काही खासदार आणि नगरसेवक जाणूनबुजून कुरापती काढण्याचे प्रकार करत आहेत. मुंबई महापालिकेतील कार्यालय आता शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्षाच्या ताब्यात आहे. आमच्या माजी महापौर, नगरसेवक नियमीतपणे तिथे बसत असतात. पण खासदार राहुल शेवाळे यांनी बेशिस्तपणाची वागणूक केलीय. “त्यांनी कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलाय तो निषेधार्थ आहे. लोकं उभं करुन, कार्यालयात घुसून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचे पक्षाचे मुख्यमंत्री आहे. त्यांच्या गटाच्या माणसांनी अशाप्रकारे कायदा-व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण करणे योग्य नाही”, असं विनायक राऊत म्हणाले. “कार्यालयाचा वाद हा विषय येऊच शकत नाही. तिथे अधिकृतपणे शिवसेनेचं कार्यालय आहे. पण या लोकांनी आगाऊपणा करण्याचा प्रयत्न केलाय. तो पोलिसांनी मोडून काढावा. नाहीतर आम्ही मोडून काढू”, असा देखील इशारा त्यांनी दिला.