TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एरंडोलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम व वैचारिक प्रबोधन.

vijay waghmare by vijay waghmare
February 21, 2026
in एरंडोल, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल ( प्रतिनिधी ) – येथील पुरा भागातून सालाबादप्रमाणे हिंदुत्व ग्रुप आणि नगरसेवक कृष्णाभाऊ ओतारी मित्र परिवाराच्या वतीने शिवजनमोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये प्रवक्ता अकॅडमीचे विद्यार्थी – पालक व शहरातील शिवप्रेमी मंडळींनी काढलेली शोभायात्रा गावातील मुख्य रस्त्यावरून शिवरायांच्या स्मारकाजवळ आली. याठिकाणी शिवरायांच्या स्मारकाला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम व वैचारिक प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शोभायात्रेच्या सुरवातीला पारोळा एरंडोलचे आमदार अमोल चिमणराव पाटील यांच्या हस्ते शिवरायांना माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. एरंडोलचे नगराध्यक्ष नरेंद्र ठाकूर व सर्व नगरसेवक देखील उपस्थित होते. पारंपरिक वाद्याच्या तालावर शोभायात्रेची सुरवात झाली. विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध संचलन, डोक्याला फेटे, भगवे ध्वज, माँसाहेब जिजाऊ आणि शिव – शंभू यांच्या जयघोषाने एकचक्रनगरी दुमदूमली. पुरा भागातून मार्गक्रमण करत एरंडोल शहरातील मुख्य रस्त्यावरून मरीमाता मंदिरापासून शिवरायांच्या स्मारकाजवळ शोभयात्रेचा समारोप झाला. याठिकाणी सर्व मान्यवर व शिवजन्मोत्सव सोहळ्यातील सर्वांनी शिवरायांच्या स्मारकाला गुलाबाचा हार अर्पण करून अभिवादन केले.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 एप्रिल 2026 !

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

शिवस्मारकाजवळ प्रवक्ता अकॅडमी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम व व्याख्यानाला सुरवात झाली. सर्वप्रथम शिवरायांच्या मूर्तीचे पूजन नगराध्यक्ष नरेंद्र ठाकूर, नगरसेवक प्रा मनोज पाटील, कृष्णा ओतारी व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, पोवाडे, भाषण यामधून शिवकार्याचा जागर केला. शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी शिवजन्म, शिवरायांच्या इतिहासावर प्रकाश टाकला. शेतकरी – कष्टकरी यांची काळजी घेणारे, महिलांच्या सन्मानाची उपाययोजना, जातीभेदाचे निर्मूलन, पर्यावरण विषयक जागृती निर्माण करणारे शिवराय खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते असे प्रतिपादन व्याख्याते पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी शिवकार्याचा जागर करणाऱ्या विद्यार्थांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

सांस्कृतिक कार्यक्रम व व्याख्यानाचे आयोजन प्रवक्ता अकॅडमीच्या माध्यमातून करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिंदुत्व ग्रुप, नगरसेवक कृष्णाभाऊ ओतारी मित्र परिवार व प्रवक्ता अकॅडमीच्या सर्व टीमने परिश्रम घेतले. कार्यक्रमाला विद्यार्थी – पालक – शिवप्रेमी नागरिकांची लक्षणीय उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रवक्ता अकॅडमीचे संचालक डॉ विजय पाटील यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ErandolShiv Jayanti celebrated with enthusiasm in Erandol

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 एप्रिल 2026 !

April 10, 2026
जळगाव

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

April 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 एप्रिल 2026 !

April 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 एप्रिल 2026!

April 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 एप्रिल 2026 !

April 7, 2026
भुसावळ

वेळेत निदान आणि उपचार गरजेचे… रजनी सावकारे

April 6, 2026
Next Post

वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मनियार बिरादरीने एकाच आठवड्यात चार साखरपुड्याचे लग्नात केले रूपांतर

January 19, 2022

अमरावतीत महिलेने दिला चार कन्यारत्नांना जन्म !

July 13, 2023

घटस्फोटाबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय

March 24, 2022

Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य, २० ते २६ फेब्रुवारी २०२२ ; जाणून घ्या..तुमच्यासाठी फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा कसा असेल

February 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group