धरणगाव (प्रतिनिधी) येथील सर्व समाज अध्यक्ष, समाज बांधव तसेच तमाम शिवप्रेमींनी मालवण येथे शिवरायांचे स्मारक कोसळल्याच्या घटनेचा निषेध नोंदवून तहसील व पोलीस स्टेशनमध्ये निवेदन सादर केले.
सर्वप्रथम छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला सर्व शिवप्रेमींनी माल्यार्पण करत जयघोष केला. तद्नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये असलेल्या राजकोट किल्ल्यावर मागील वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. ४ डिसेंबर २०२३ रोजी उभारण्यात आलेला शिवरायांचा पुतळा २६ ऑगस्ट २०२४ रोजी कोसळला. कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. पोलीस निरीक्षक पवन देसले आणि नायब तहसिलदार (महसूल) संदीप मोरे यांना सर्व समाज अध्यक्षांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. सर्व उपस्थित शिवप्रेमींच्या वतीने लक्ष्मण पाटील यांनी झालेल्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. मालवण येथे शिवरायांचे स्मारक कोसळले यामुळे महाराष्ट्राच्या स्वाभिमान दुखावला गेला आहे. या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर एसआयटी चौकशी करून कठोर कार्यवाही करण्यात यावी तसेच अशा स्वरूपाची घटना कोणत्याही महापुरुषांच्या बाबतीत घडू नये याची शासनाने खबरदारी घ्यावी. धरणगाव शहरातील सर्व स्मारकांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे तसेच शिवरायांच्या पूर्णाकृती स्मारकाच्या जागेवर माहिती दर्शविणारा फलक लावण्यात यावा आणि शिवस्मारकाचे काम गुणवत्तापूर्ण व्हावे अशी मागणी पाटील यांनी सर्वांच्या वतीने केली. या प्रकरणात सर्व जाती धर्मातील अनुयायांची मने दुखावली गेली आहेत.
याप्रसंगी माळी समाजध्यक्ष विठोबा माळी, रामकृष्ण महाजन कुणबी समाजाचे माधवराव पाटील, आबा पाटील, तेली समाजाचे सुनील चौधरी, राजेंद्र ठाकरे, जैन समाजाचे राहुल जैन, श्रेयांश जैन, मराठे समाजाचे भरत मराठे, मुस्लिम समाजाचे नईम काझी, करीम लाला मोमीन, फिरोज बेलदार, नदीम काझी, शेख इसामोद्दीन, खलील खान, नगर मोमीन, नविद काझी, कासम अहिलेकार, वसीमभैय्या कुरेशी, हसन मोमीन, भोई समाजाचे सुनील जावरे, राजपूत समाजाचे जीवनसिंह बयस, प्रा.सम्राटसिंह परिहार, का.कु.ब्राम्हण समाजाचे विजयकुमार शुक्ल, स.ब्राम्हण समाजाचे डॉ.किशोर भावे, चर्मकार समाजाचे भानुदास विसावे, धर्मराज मोरे,सोनार समाजाचे सुनील सोनार, नाभिक समाजाचे सतिश बोरसे,अशोक झुंझारराव, शिंपी समाजाचे मोहन मांडगे, मेहतर समाजाचे संजय पटूने, पापा वाघरे, बौद्ध समाजाचे निलेश पवार, क्षत्रिय समाजाचे राजेश मकवाने, पुरुषोत्तम सुतारे,धनगर समाजाचे जितेंद्र धनगर, सम्राट धनगर भीमराव धनगर, परीट समाजाचे विनोद रोकडे,कन्हैया रायपुरकर, सुतार समाजाचे मधुकर शिरसाठ, मातंग समाजाचे एकनाथ चित्ते, सुधाकर मोरे, अविनाश बाविस्कर, पी डी पाटील, राजेंद्र वाघ, यासंह उबाठा सेनेचे गुलाबराव वाघ, जयदीप पाटील, भागवत चौधरी, संतोष सोनवणे, काँग्रेसचे व्ही.डी.पाटील, बंटी पवार, रामचंद्र माळी, राष्ट्रवादी काँग्रेस श.प.पक्षाचे धनराज माळी, विशाल देवकर, लक्ष्मण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अ.प.पक्षाचे ज्ञानेश्वर महाजन, शिवसेनेचे शिंदे गटाचे पप्पू भावे, विलास महाजन, बुट्या पाटील, भाजपचे संजय महाजन, दिलीप महाजन, चंदन पाटील आदिसह शहरातील सर्व समाजध्यक्ष, पंचमंडळ, राजकीय पक्ष, सामाजिक व वैचारिक संघटनांचे प्रतिनिधी आदींनी धरणगावकरांकडून सदरील घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला.