पाळधी (प्रतिनिधी) : धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे यांची शिवसेनेच्या मागासवर्गीय सेनेच्या जिल्हाप्रमुखपदी निवडची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी पाळधी येथील कार्यक्रमात केली. मुकुंदराव नन्नवरे हे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. ते भारिप बहुजन महासंघाचे ते जिल्हाध्यक्ष होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला व त्यांना पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांना सर्वसाधरण आरक्षणातून सभापती केले. निवड प्रसंगी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, खासदार उन्मेष पाटील, आमदार शाहजी बापू पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार लता सोनवणे, आमदार सुरेश भोळे, आमदार चंदू पटेल आदी उपस्थित होते. मुकुंदराव नन्नवरे यांच्या निवडीचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वागत केले.