जळगाव (प्रतिनिधी) माऊली वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक श्री १००८ महामंडलेश्वर महंत वारकरी संप्रदायाचे मठाधीश ह भ प भगवान बाबा महाराज यांच्या आज शिवसेना शहर संघटनेमार्फत साजरा करण्यात आला. याप्रसंगी माऊली वारकरी शिक्षण संस्थेला २६ वर्ष झालेत.
२६ वर्षात वारकरी शिक्षण संस्था संस्थेमार्फत हजारो विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाचे आवड निर्माण करून आज अनेकांची हरिभक्त परायण, कीर्तनकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य तयार केलेत. म्हणून पूर्ण जिल्ह्यात त्यांनी ओळख निर्माण केली आहे. असे कार्य कुशल महंत भगवान बाबा यांच्या संस्थेतून विद्यार्थी घडवले, एवढेच नव्हे तर आजही दररोज हजारो नागरिक या ठिकाणी भोजन घेत असतात. असे बाबांच्या कार्य असून या कार्याची दखल घेत आज त्यांचा वाढदिवस असल्याने शिवसेनेच्यावतीन सत्कार करण्यात आला.
यावेळी जळगाव लोकसभेचा संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांच्याकडे महंत भगवानदास बाबा यांनी वारकरी शिक्षण संस्थेचा काही समस्या उपस्थित केल्या. प्रमुख्याने वारकरी शिक्षण संस्थेच्या वरून महावितरणची इलेक्ट्रिक पोल वरील तार गेल्या असल्याने तारा चा मार्ग बदलवून देण्यात यावा व भविष्यात वारकरी शिक्षण संस्थासाठी सभामंडप देखील या ठिकाणी उभा करून देण्यात यावा. अशी मागणी महंत भगवान दास बाबा यांनी केली. संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी या समस्याचे पालकमंत्र्यांनाकडून लवकरच मार्गी लावले जाईल, असे आश्वासन दिले. व त्याचवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे व महावितरणचे अधिकारी यांनी मोबाइल वर संपर्क करुन प्लॅन ईस्टिमेट व मोज माप करण्याची विनंती केली, लगेच सोमवारी संबंधित ठिकाणी येवुन कार्यवाही करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे व महावितरण अधिकार्यांनी दिले. यावेळी हनुमान नगरमधील समस्या सुद्धा तात्काळ जागेवरच सोडण्यात आल्या.
यावेळी चर्मकार महासंघाचे कार्याध्यक्ष भानुदास विसावे, शिवसेना संघटक धीरेंद्र पुरभे, ज्वलंत हिदुंत्वाचे पुरस्कार करणारे दै सामनाचे प्रतिनिधी बाळासाहेब जाधव, राहुल रोकडे, युवासेनेचे कमलेश बोरसे, हनुमान नगर शाखाप्रमुख सूनील रतन महाजन, युवकांचे नेतृत्व कन्हैया देवा महाजन, शिवसेना उपशहर प्रमुख दीपक पाटील, पिंटू महाजन, समाधान महाजन, सुरेश महाजन, छोटू महाजन, शिवाजी पाटील, सामाजिक कार्यकर्ते नामदेव मराठे, जगदीश मराठे, दीपक महाजन, सर्व हनुमान नगरमधील शिवसैनिक उपस्थित राहुन बाबांचे आशिर्वाद घेतले.