मुंबई (वृत्तसंस्था) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कालपासून पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. तेव्हापासूनच राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. यासर्व घडामोडींवर शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केलं आहे. शिवसेना संघर्ष करणारा पक्ष, जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल, सत्ता पुन्हा मिळवता येते, पण पक्षाचीही प्रतिष्ठा असते, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
शिवसेना संघर्ष करणारा पक्ष आहे. जास्तीत जास्त सत्ता जाईल आणि सत्ता पुन्हा मिळू शकते, पण पक्षाची प्रतिष्ठा सर्वात वरती आहे असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी यावेळी दिले. आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट होईल अशी माहिती संजय राऊतांनी दिली. तसेच, आज सकाळीच एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरुन तासभर चर्चा झाल्याची माहिती देखील राऊतांनी यावेळी दिली. एकनाथ शिंदे आणि सर्व आमदार स्वगृही परत येतील. आज एकनाथ शिंदे यांच्याशी माझ फोनवर बोलण झाले. मी याबद्दची कल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली आहे. काही समज आणि गैरसमज नक्की आहेत पण ते लवकरच दुर हेतील याचा मला विश्वास आहे. ५६ वर्षात शिवसेनेने अनेकदा संकटातून गरूड झेप घेतली आहे.
एकनाथ शिंदेंना पक्ष सोडणं सोपं नाही आणि आम्हालाही त्यांना सोडणं सोप नाही, असंही ते म्हणाले. हा आमच्या घरातील विषय आहे. नाराजी दूर होईल, सर्व आमदार परत येतील. एकनाथ शिंदेंचं बंड शांत होईल, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला आहे. तसेच, आसाममध्ये सर्व आमदारांनी पर्यटन करावे देशभर फिरावे. गुवाहाटीला काझीया रंगा जंगल खुप सुंदर आहे.असं संजय राऊत म्हणाले. पुढे राऊत म्हणाले की, राज्यपालांना कोरोना झाला असल्याने काम थोडं धीम्या गतीने सुरु आहे. राज्यपालांना थोडं बरं वाटू द्या त्यानंतर कोणाकडे किती आमदार आहेत ते समजेलच. उगाच जास्त उतावीळपणा नको. असं संजय राऊत म्हणाले आहेत.