मुंबई (वृत्तसंस्था) राजसभेच्या निवडणूकीच्या निकालानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना आणि खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. शिवसेना ही महाविकास आघाडीतील “ढ” टीम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या जागेवर भाजपाच्या धनंजय महाडिकांचा विजय झाला आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपाच्या धनंजय महाडिकांमध्ये जोरदार लढत सुरू होती. त्यामध्ये आता धनंजय महाडिकांनी बाजी मारली आहे. यानंतर आता विविध प्रतिक्रिया येत आहेत. या निकालानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना आणि खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. “शिवसेना ही महाविकास आघाडीतील “ढ” टीम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. बोरू बहाद्दर कारकून आणि “ढ” टीम चे कप्तान तोंडावर आपटले,” असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.
‘माविआ’सह शिवसेनेला मोठा धक्का
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे दोन उमेदवार मैदानात होते. त्यामध्ये आता धनंजय महाडिकांनी बाजी मारली आहे. भाजपाने धनंजय महाडिकांच्या रुपाने सहावा उमेदवार रिंगणात उतरवत मोठी खेळी खेळली होती. महाडिक यांच्या विजयानंतर महाविकास आघाडीसह शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.