जळगाव (प्रतिनिधी) अण्णा हजारे सारख्या जेष्ठ समाजसेवकाप्रमाणे शिवराम पाटलांनाही संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी सैनिक समाज पार्टी महाराष्ट्र कार्यकारिणी अॅड. शिवाजी डमाळे यांनी पोलीस अधीक्षकांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
अॅड. शिवाजी डमाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सैनिक समाज पार्टी जनरली प्रस्तापीत घराणेशाही पक्षातील नेत्यांच्या दुष्टप्रवृती विरूध्द आवाज उठवित असते. परंतु शिवराम पाटील, हे नेत्यांच्या नावासह लिहीतात. त्यांचे विचार प्रखर असतात. सत्य कटू असते असे म्हणतात. नरेंद्र दाभोलकर पण समाजातील अंधश्रद्धेवर घाला घालणारे लिखाण करत असत. तरी पण त्यांचा घात करण्यात आला होता. शिवराम पाटील, राजकीय नेत्यांचे नाव घेऊन त्यांच्या भ्रष्टाचारी प्रवृत्तीचा समाचार घेणारे लिखाण करत असतात. राजकारणामध्ये विरोधी विचाराला तोंड देण्याची नैतिकता नसेल तर आपल्या पाळलेल्या गुंडामार्फत रोडवर आंदोलन करून आम जनतेस वेठीस धरले जाते. विरोधकांना तोडू फोडू कोथळा बाहेर काढू रस्त्यावर फिरू देणार नाही. अशा शब्दाचा वापर केला जातो.
बहुतेक प्रस्तापीत घराणेशाही पक्षातील नेत्यांच्या गुलामाच्या फौजेमध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांना बाॅडीगार्ड म्हणुन ठेवले जात असेल,आणि बेकायदेशीर कट्टा वापरत असतील तर, शिवराम पाटील सारख्या सज्जन सजग ईमानदार समाजहितासाठी लिखाण करणाऱ्या नागरीकांना शासनामार्फत मोफत पोलिस संरक्षण देण्याची तरतूद असते. अण्णा हजारे सारख्या जेष्ठ समाजसेवकाप्रमाणे शिवराम पाटलांनाही संरक्षण देण्यात यावे, असे यात म्हटले आहे.