चाळीसगाव (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत आहेत. शिवचरित्रातून जगण्याचा मूलमंत्र तर मिळतोच मात्र यशाचा शिवमार्ग सुद्धा गवसतो. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे विचार हे इतिहास वर्तमान व भविष्यही आहेत, असे प्रतिपादन चाळीसगावचा एकदंत महोत्सवात तिसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात “यशाचा शिवमंत्र” या विषयावर बोलताना प्रा. डॉ विनोद बाबर यांनी केले.
एकदंत महोत्सवाच्या माध्यमातून चाळीसगावमध्ये सांस्कृतिक मेजवानी 10 दिवस दिली जाणार आहे. आज मेजवानीचा तिसरा दिवस, हास्यजत्रा फेम कलाकारांनी काल खळखळून हसवल्यानंतर आज विचारांना चालना देणारे व्याख्यान प्रेक्षकांच्या प्रचंड उपस्थितीमध्ये संपन्न झाले. यावेळी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, शिवराय व विठू माऊली ही माझी दैवत आहेत. शिवरायांचा विचार तरुण पिढी पर्यंत पोहोचले पाहिजेत. तसेच भारताच्या सांस्कृतिक संपन्नतेची सुद्धा माहिती व्हायला हवी, यासाठी एकदंत महोत्सवात सांस्कृतिक महोत्सवामध्ये या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेला आहे. यातून आपण सर्व नक्कीच चांगला बोध घ्याल असा मला विश्वास आहे, असेही आमदार चव्हाण म्हणाले.