TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अ.भा.मराठी नाट्यपरिषदेचा रंगकर्मी पुरस्कार सुषमा प्रधान व हेमंत पाटील यांना प्रदान !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 5, 2024
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) रंगभूमीची मध्यवर्ती संघटना म्हटल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ११८ हून अधिक काळापासून रंगभूमीची सेवा करणारी नाट्यकर्मींची एकमेव संघटना आहे. याच संघटनेची जळगाव जिल्हा शाखा २०१९ पासून अस्तित्वात आली. जळगाव जिल्हा शाखेतर्फे दिला जाणारा रंगकर्मी पुरस्कार यंदा ज्येष्ठ रंगकर्मी सुषमा प्रधान यांना तर युवा रंगकर्मी पुरस्कार हास्यजत्राफेम अभिनेते हेमंत पाटील यांना प्रदान करण्यात आला.

दि. २ फेब्रुवारी रोजी आय.एम.आर.महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून केसीईचे सांस्कृतिक प्रमुख शशिकांत वडोदकर, केसीई व्यवस्थापन समिती सदस्य ॲड.प्रविणचंद्र जंगले, नाट्यपरिषदेचे उपाध्यक्ष ॲड.संजय राणे, नाट्यजागर कलेचा स्पर्धा समन्वयक दिलीप दळवी (मुंबई), डॉ.अनिल बांदिवडेकर (मुंबई) व विलास पागार (पालघर) यांची उपस्थिती होती. या मान्यवरांच्या हस्ते मानपत्र, शाल, श्रीफळ व पाच हजार रुपये रोख असे स्वरुप असणाऱ्या रंगकर्मी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

READ ALSO

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्कारप्राप्त सुषमा प्रधान !
गेल्या ६० वर्षांपासून रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या श्रीमती सुषमा प्रधान या केवळ जळगावच्या रंगभूमीवरच नाही तर आकाशवाणी जळगाव केंद्राच्या नाट्यविभागातील ‘अ’ श्रेणी प्राप्त एकमेव महिला कलाकार आहेत. याशिवाय, शहरातील टेलिफोन खात्यातील प्रथम महिला टेलिफोन ऑपरेटर, युनियनच्या पहिल्या महिला सुपरवायझर, एकमेव महिला सेक्रेटरी अशी अनेक पदे त्यांनी भूषविली आहेत. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्राची आवड असल्याने, अभिजात महिला मंडळ, सी.के.पी. समाज यांचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे होते. सांस्कृतिक क्षेत्रात राज्य नाट्य स्पर्धा, कामगार नाट्य स्पर्धा गाजविण्यासोबतच एस.टी.महामंडळ, कामगार नाट्य, महेश करंडक स्पर्धा, रोटरी क्लब, विवेकानंद प्रतिष्ठान, लोकमत सखीमंच, भुलाबाई महोत्सवासाठी त्यांनी परीक्षक म्हणून काम केले आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर ‘मी सावित्री बोलतेय’ या एकपात्री प्रयोगाचे जळगाव जिल्हा, महाराष्ट्र व देशाच्या सीमा पार करुन सातासमुद्रापलिकडे अमेरिकेत देखील त्यांनी प्रयोग सादर केले आहेत.

युवा रंगकर्मी पुरस्कारप्राप्त हेमंत पाटील !
जळगावसारख्या शहरातील रंगकर्मी दूरचित्रवाहिनीवर झळकून अवघ्या महाराष्ट्रात सेलेब्रिटी म्हणून सुप्रसिध्द अभिनेता होऊ शकतो या गोष्टीला प्रत्यक्षात आणून शहरातील नव्या रंगकर्मींच्या आशेला ग्लॅमर प्राप्त करुन देण्यासोबत इथल्या बोलीभाषेला राज्यभरात लोकमान्यता महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून मिळवून देणारे अभिनेते हेमंत पाटील यांना युवा रंगकर्मी पुरस्कार देण्यात आला. शहरातील केसीई सोसायटीच्या मूळजी जेठा महाविद्यालयात एन.सी.सी.कॅडेट असतांना एक नाटक पाहण्याच्या निमित्ताने नाट्यक्षेत्रात प्रवेश झाला. मूळजी जेठा महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागात डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षीत होत नाट्यशास्त्रात पदवी व कोल्हापूर येथे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. महाविद्यालयीन जीवनातच मूळजी जेठा महाविद्यालयाकडून महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्यस्पर्धा व अनेक राज्यस्तरावरील एकांकिका स्पर्धा गाजवत अनेक पारितोषिके पटकावलीत. महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचल्यानंतरही रंगभूमीशी व आपल्या शहराशी असलेली नाळ कायम ठेवत मूळजी जेठा महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाचा प्रमुख म्हणून कार्यरत राहून जळगावातील नवीन कलावंतांची पिढी घडवत आहेत.

पुरस्कार वितरण सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी अ.भा.मराठी नाट्यपरिषदेच्या कोषाध्यक्ष डॉ.शमा सराफ, मुख्य कार्यवाह ॲड.पद्मनाभ देशपांडे, सहकार्यवाह योगेश शुक्ल, सदस्य सुबोध सराफ, वैभव मावळे, दिनेश माळी, हर्षल पवार यांनी परिश्रम घेतलेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.श्रध्दा पाटील यांनी तर आभार प्रदर्शन ॲड.पद्मनाभ देशपांडे यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

August 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 ऑगस्ट 2026 !

August 24, 2026
Next Post

प्रसिद्ध मल्ल भानुदास विसावे यांचा धरणगाव नाईट ग्रुपकडून सत्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी : अमरावती-पुणे, बडनेरा- नाशिक दरम्यान विशेष मेमू !

October 21, 2023

सामाजिक कार्यकर्त्या पत्रकार प्रा. जयश्री दाभाडे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

August 29, 2021

जळगाव दूध संघ प्रकरणी ‘जैसे थे’चा निर्णय ; प्रशासक की, संचालक मंडळ?, जाणून घ्या…हायकोर्टाचा निर्णय !

August 1, 2022

नगरपालिका रुग्णालयात सुरु होणार आता शवविच्छेदन – डॉ. नी. तू. पाटील यांच्या पाठपुराव्याला अखेर यश

December 22, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group