
भुसावळ, प्रतिनिधी : दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील ५०० मेगावॅट गेटसमोरील चौफुलीवर बुधवारी (दि. ७) सायंकाळी चार वाजेच्या सुमारास भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर जखमींना तातडीने परिसरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ३० एए ४६५३ क्रमांकाची कार आणि एमएच १९ डीआर ०७९० क्रमांकाची दुचाकी यांच्यात हा भीषण अपघात झाला. ५०० मेगावॅट गेटसमोरील चौफुलीवर रस्ता ओलांडत असताना भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातातील दोन्ही जखमी निंभोरा येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. धडक इतकी जोरदार होती की, दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी हलविण्यास मदत केली. काही काळ चौफुलीवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते
















