एरंडोल (प्रतिनिधी) कॉंग्रेस सेवा फाऊंडेशनच्या एरंडोल तालुका मिडिया प्रमुखपदी तालुक्यातील रिगणगाव येथील काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते शोयब शब्बीर शाह यांची निवड करण्यात आली आहे. सदर निवड ही प्रदेशाध्यक्ष अँड. सुभाषचंद्र गोडसे यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष जलील पटेल यांनी केले आहे.
या निवडीबाबत त्यांचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड. संदीपभैय्या पाटील, आमदार शिरीषदादा चौधरी, जिल्हा परिषदेचे गटनेते अप्पासाहेब प्रभाकर सोनवणे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस बापूसाहेब अजबराव पाटील, काँग्रेस सेवा फाऊंडेशनचे प्रदेश पदाधिकारी कपिल सूर्यवंशी, प्रणयज विचारे, प्रदीप डाकरे, शुभम शिंदे, अनिल जाट, गौरवसिंग चौहान, रावेर तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा मनीषा पाचपांडे, काँग्रेस सेवा फाऊंडेशनच्या जिल्हाउपाध्यक्षा मीनाक्षी जावरे, एरंडोल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय अण्णा महाजन, शहरध्यक्ष तथा नगरसेवक योगेश महाजन, जिल्हाउपाध्यक्ष ओबीसी भदाणेद, युवक काँग्रेस अध्यक्ष इम्रान, सत्तार खाटीक, मदन भावसार, मुस्तकींम बागवान, संजय कलाल, डॉ. बोहरी, काँग्रेस सेवा फाऊंडेशनचे तालुका अध्यक्ष जुनेद पटेल, आणि तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व फ्रंटलचे अध्यक्ष व सर्व नेते पदाधिकारी, कार्यकर्ते आदींनी अभिनंदन केले आहे.