जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा विधानसभा मतदार संघाच्या शिवसेना आमदार लता सोनवणे यांची जातवैधता प्रकरणातील याचिका उच्च न्यायालयाचा औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली. दरम्यान, या निर्णयाच्या विरोधात त्या सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती सोनवणेंच्या वतीने देण्यात आली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
आमदार सोनवणे या चोपड़ा मतदारसंघातून अनुसूचित जमाती प्रवर्गातून २०१९ मध्ये निवडून आल्या आहेत. त्यांचे पराभूत प्रतिस्पर्धी जगदीशचंद्र वळवी यांनी सोनवणे यांचा जातीचा दाखला अवैध असल्याची तक्रार केली होती. नंदुरबार येथील जात पडताळणी समितीने सोनवणे यांचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध असल्याचा निर्णय दिला होता. या निर्णयाविरुद्ध सोनवणे यांच्या याचिकेवर खंडपीठाने चौकशी करून निर्णय घेण्याचे आदेश जात पडताळणी समितीला दिले होते. समितीने पूर्वीचाच निर्णय दिल्याने आमदार सोनवणे पुन्हा खंडपीठात गेल्या होत्या.
















