भोपाळ (वृत्तसंस्था) मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) खरगोन जिल्ह्याच्या महेश्वरमध्ये 11 वर्षीय HIV पीडित मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक (Crime News) घटना समोर आली आहे. घटनेनंतर पीडितेचं गुप्तांग फाटलं गेलं आहे. याचं ऑपरेशनही झालं.
वेदनेने विव्हळत असणाऱ्या मुलीला काही दिवसांपूर्वी इंदूरला आणलं. येथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र उपचारासाठी पैसे नाहीत. आता घर विकून ऑपरेशन करावं लागेल, असंही कुटुंबीयांचं म्हणणं आहे. 12 मार्चच्या दुपारी मुलगी घरात एकटी होती. यादरम्यान आरोपी दीपक यादव (34) घरात घुसला आणि मुलीवर बलात्कार केला. कोणाला न सांगण्याच्या अटीवर धमकी ही दिली. कुटुंबीय घरी आल्यानंतर पीडितेने घडलेला प्रकार सांगितला. पीडितेचं गुप्तांग फाटलं. खूप रक्त वाहिलं. कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनीही केस दाबण्यासाठी धमकी दिली. शेवटी प्रयत्न करून केस दाखल झाली. आरोपीला तुरुंगात रवाना करण्यात आलं आहे.
शेवटी कलेक्टरांच्या मुलीच्या ऑपरेशनसाठी 50 हजार रुपये दिले. आणि इंदूरमध्ये पीडितेवर उपचार झाले. मुलगी HIV पीडित आहे. तिच्यासाठी दररोज 200 रुपये खर्च होतो. याशिवाय 200 रुपये औषधांवर खर्च होतो. आधीच मुलीच्या आजारामुळे कुटुंबावर संकट कोसळलं आहे. त्यात मुलीवर बलात्कार झाल्यामुळे त्यांच्या संकटात अधिक वाढ झाली आहे.