जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मुलाच्या बालसुधार गृहात असलेल्या १३ वर्षीय मुलाने १० वर्षीय बालकासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी याप्रकरणी विधीसंघर्षीत बालकाविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील मुलांच्या बालसुधार गृहात असलेल्या मुलांपैकी एका १३ वर्षीय मुलाने दि. ११ सप्टेंबर रोजी १० वर्षीय बालकाला मध्यरात्री अडीच वाजता त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्या पीडित बालकाने ही घटना बालसुधारगृहाचे अधीक्षकांना सांगितली. त्यानंतर बुधवारी बालसुधारगृहाचे अधीक्षक रवीकिरण अहिरराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.